पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा…जिजाऊंच्या समाधी स्थळी अभिषेक पूजन व आदरांजली…

0
48

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :- 

रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विध्यमानाने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिवर्षी पौष शुक्ल १ शके १९४६ जन्मोत्सव सोहळा आज सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली…. या कार्यक्रमाला रोजगार हमी योजना, फलोत्पादन , खार विकास मंत्री भरत गोगावले, महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील पाचाड ग्रामपंचायत सरपंच सीमा बेंदुगडे, पाचाड ग्रामस्थ रघुवीर देशमुख, अनंत देशमुख, माजी सरपंच रांजेद्र खातु, जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीजकर आदी शिवभत्त उपस्थित होते… तर पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हजर होते….