रायगड शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
रायगड जिल्ह्यातील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे येथे राष्ट्रीय युवा दिवस स्पर्श 2025 तसेच स्वामी विवेकानंद जयंती उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आज साजरा करण्यात आला… औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आय एमसी चेअरमन माननीय श्री.सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला… कार्यक्रमाची सुरवात अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, देवी स्वरस्वती, राजमाता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली…
या प्रसंगी उद्योजक म्हणून नाव रूपास आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला… त्याचप्रमाणे संस्थेतील 2024 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले… तसेच क्रीडा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले… या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकल्प समन्वयक, ज्ञान प्रबोधनी एज्युकेशन पुणे यांचे माननीय श्री.ओमकार बानाईत हे मुख्य प्रवक्ते म्हणून लाभले होते… त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आयएमसी चेअरमन, थरमॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खोपोलीच्या केमिकल विभाग प्रमुख एचआर मॅनेजर श्री.सुनील कदम साहेब, रोह्याच्या एक्सेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड विभाग प्रमुख, स्वामी विवेकानंद संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण संस्था रोहा रायगडचे अध्यक्ष माननीय श्री.सुशील रुळेकर त्याचप्रमाणे प्रशिक्षण संस्थेचे पाटील सर, वारे सर आदी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते…