गाईच्या वासरावर लिंगपिसाट परप्रांतीय कामगाराचा लैंगिक अत्याचार… महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

0
83

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने ):- 

राज्यामध्ये दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये पाळीव प्राण्यांना देखील वासनेचे शिकार बनवले जात आहे…काही महिन्यापूर्वी महाड तालुक्यामध्ये टेमघर येथे म्हशीच्या लहान वासरावर देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती… आज त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी येथे घडली आहे…मोरांडेवाडी येथील रहिवाशी गंगाराम जाधव यांच्या गोठ्यातील गाईच्या दहा महिन्याच्या लहान वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे… एका परप्रांतीय कामगाराने हे लैंगिक अत्याचार केल्याचे समजते… बळीराम अनिराम यादव वय वर्ष 50 मूळ राहणार ओरिसा,सध्या राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी असे आरोपीचे नाव असून आरोपीला महाड एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन गाईच्या लहान वासराची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांकडून पुढील पंचनामा प्रक्रिया सुरू आहे…गाईच्या लहान वासरावर नराधम परप्रांतीय याने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिले असता संबंधित आरोपीने गाईचा गोठा देखील जाळण्याचा प्रयत्न केला…महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 326 (ग) सह प्राण्यांना कृतीने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (A), 11(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…