वेसावा कोळी सीफूड फेस्टिवल 2025 जल्लोषात… खाऊनशी जा रं ताजा ताजा…घेऊनशी जा रं ताजा ताजा… 

0
44

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):- 

मुंबईतील प्रसिद्ध कोळीवाड्यांपैकी असलेला वर्सोवा येथील वेसावा कोळीवाडा प्रसिद्ध आहे…महाराष्ट्रामधल्या सर्व कोळीवाड्यांपैकी सगळ्यात श्रीमंत आणि प्रत्येक सण-उत्सव मोठया थाटामाटात,जल्लोष्यात साजरा करणारा एकमेव कोळीवाडा म्हणून वेसावा कोळीवाड्याची ओळख आहे…वेसावा कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगलाय देवी हिच्या मंदिर कोळीवाडामध्ये प्रवेश करताच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते …नवीन वर्ष सुरु झाले की मुंबईमध्ये विविध महोत्सवाला सुरुवात होते…अशातच मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा भागात कोळी सी-फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते…यंदाचे या फेस्टिवलचे २१ वे वर्ष होते… तीन दिवस चालणारा हा फेस्टिवल यंदा १०,११,१२ जानेवारी असा आयोजित केला होता…महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशभरातून हजारो नागरिक या फेस्टिवलला उपस्थिती लावतात …तीन दिवस या फूड फेस्टिवलमध्ये खास कोळी मसाल्यांमध्ये बनवलेल्या पदार्थांचा खवय्यांनी आस्वाद घेतला…कोळी महिलांच्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळावी आणि कोळी संस्कृतीचे दर्शन घडावे… म्हणून या फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते…सदर वेसावा कोळीवाडा सीफूड फेस्टिवलचे भव्य आयोजन महेंद्र ग.लडगे (अध्यक्ष ),स्वप्नील वी. डोंगरीकर (उपाध्यक्ष),हरिश्वर रामचंद्र घुस्ते (सेक्रेटरी )रणजीत दे. काळे (सह सेक्रेटरी ),पंकज जोनचा (खजिनदार )जयेंद्र लडगे,यांच्या मुख्य अध्यक्षतेखाली करण्यात आले…