नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (कुंदा म्हात्रे, सुरज गरंडे):-
स्वच्छतेत नवी मुंबई शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला खरा पण त्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली त्या सफाई कामगारांवर मात्र महापालिका प्रशासनाने घोर अन्याय केला आहे. समान काम, समान वेतन धोरण अक्षरशः कचऱ्यात फेकल्याने साडे आठ हजार संतप्त सफाई कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे…नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) कामगार गेल्या २७ डिसेंबर २०२४ पासून समान काम, समान वेतन या प्रमुख मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषणावर गेले आहेत. या साखळी उपोषणामुळे महानगरपालिकेच्या विविध नागरी सेवांवर मोठा परिणाम दिसून येत आहे.कामगार संघटनांनी वारंवार आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाकडे निवेदने दिली, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. समान काम करणाऱ्या सर्व कामगारांना समान वेतन हीच प्रमुख मागणी असून, प्रशासनाने केवळ तोंडी आश्वासन देण्याचे धोरण ठेवले आहे.साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर एक शिष्टमंडळ महानगरपालिका अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, मात्र तेही हवेतच विरले.या साखळी उपोषणामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा या अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले असून, नागरिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहेत…पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे…कामगार संघटनेची मागणी आहे कि,समान काम केल्यावर वेतनात भेदभाव का?आम्ही गेली अनेक वर्षे संघर्ष करतोय, पण प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत आहे…गेल्या सोळा दिवसांपासून हा संघर्ष सुरू असून तीन कामगाराची प्रकृती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.या संपामुळे नागरी सेवांवर मोठा परिणाम झाला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकार आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा साखळी उपोषण अति तीव्र होण्याची चिन्हे आहेत…सफाई कामगारांना समान काम, समान वेतन हे धोरण लागू केले तर त्यांचा पगार कमी होईल, असा निष्कर्ष प्रशासन समितीने काढला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी या समितीच्या निर्णयाचा निषेध केला…व आमरण उपोषणास बसलेल्या नऊ कामगारांपैकी तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ महापालिका रुग्णालय वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले …प्रामुख्याने खालीलप्रमाणे त्यांची नावे आहेत… १) अंकुश वाडकर २) प्रशांत मोरे ३) विजय दुर्गे अशी रुग्णांची नावे असून सदर माहिती समाज समता कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर आणि उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितले…