सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून पत्रकार संघाची गरिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार:सिराज शेख

0
43

रायगड  शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन ) :-

मुरुड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांना सोबत घेऊन पत्रकार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून पत्रकार संघाची गरिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सिराज हाशम शेख यांनी मुरुड शहरातील भंडारी बोर्डिंगमधील सभागृहात आयोजित नूतन कार्यकारिणी निवड सभेत मनोगत व्यक्त करताना केले…
नूतन कार्यकारिणी सभा ही मावळते अध्यक्ष अमुलकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली… यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सिराज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले की, आजचा दिवस हा माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे… आज मला पत्रकार संघाच्या अध्यक्ष होण्याचा मान मावळते अध्यक्ष अमुलकुमार जैन, ज्येष्ठ पत्रकार मेघराज जाधव, उदय खोत आणि सर्व सहकारी यांनी मिळून मुरुड तालुका पत्रकार संघाची धुरा माझ्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता दिली आहे… त्यांच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जावून देणार नाही… मात्र मुरुड तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील एकमेव असा पत्रकार संघ आहे की, तो कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता एकोप्याने राहून एकमताने निर्णय घेत आहे… इतर पत्रकार संघात अध्यक्ष पदासाठी निवडणुका घेतल्या जातात… सर्व सदस्य यांना सोबत घेऊन पत्रकार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे… तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून पत्रकार संघाची गरिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले…
पत्रकार संघाच्या विशेष सभेत सुरवातीला पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान ज्येष्ठ सल्लागार प्रकाश सद्रे, पत्रकार शहासने तसेच भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली… मुरुड तालुका पत्रकारसंघाच्या अध्यक्षपदी सिराज शेख, उपाध्यक्षपदी सुधीर नाझरे, सचिवपदी नितीन शेडगे, सहसचिवपदी गणेश चोडणेकर, खजिनदारपदी उदय खोत तर ज्येष्ठ सल्लागारपदी मेघराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे… ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी प्रकाश सद्रे यांनी मुरुड केळघर रोहा या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याने तो रस्ता झाला असल्याचे राजकारणी आजही त्यांच्या सभेत सांगत आहेत… तरी मुरुड केळघर रोहा रस्त्याला कैलासवासी प्रकाश सद्रे यांचे नाव द्यावे याबाबत सार्वजिक बांधकाम विभाग यांच्याकडे मागणी करावी… त्याचप्रमाणे यंदा 31 जानेवारी रोजी जंजिरा मुक्ती संग्रामदिन साजरा करण्याबाबत एकमत होऊन हा दिन सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे… सदर सभेसाठी मुरुड तालुका पत्रकार संघातील सर्व सदस्य उपस्थित होते…