माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माणगाव तालुक्यातील हरवंडी कोंड येथील तरुणी नवनिता भारत कदम मी कामावर जाते सांगून घराबाहेर गेली असून अजून घरी न परतल्याने शोधाशोध सुरु करण्यात आली आहे…याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,13 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवनिता भारत कदम रा. हरवंडी कोंड, तालुका माणगाव येथील मिसिंग व्यक्ती नवनिता भारत कदम, ही बावीस वर्षाची तरुणी घरातून सकाळी द.ग.तटकरे विदयालय येथे कामाला जाते असे सागुंन घरातून निघून गेली… ती अद्याप पर्यंत घरी परत न आल्याने फिर्यादी सुरेश काशीराम कदम राहणार हरवंडी कोंड यांनी तिची आजूबाजूच्या परिसरात, शेजारील गावात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता अद्याप पर्यंत मिळुन आली नाही…सदर मिसिंग व्यक्तीचे वर्णन चेहरा गोल, उंची ०५ फुट ०२ इंच, रंग- सावळा, केस काळे व लांब, अंगाने सडपातळ, अंगात नेसून-आकाशी रंगाचा टॉप व लेगीस, पायात-सँडल अशा वर्णनाची मिसिंग नवनीता कदम असून संपर्क आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात नोंद घ्यावी या घटनेची तक्रार सुरेश काशीराम कदम यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अधिक तपास माणगाव पोलीस दोडकुलकर पोलीस तुंतुने करीत आहेत…