बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवण्यासाठी धडपड…

0
61

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :-

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून  उद्धव ठाकरे यांना हटवण्यात यावे असा ठराव शिंदे गटाच्या बैठकीत पार पडला आहे… हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे… शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे…
याबाबत संताप व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने भारताचे गृहमंत्री मा‌.अमितजी शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलले, हे जर यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्र द्रोही आहेत, स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटवा असे बोलताना यांची जीभ कशी झडत नाही, हा माझा प्रश्न आहे… आज पैसा आणि सत्ता यांच्या हाती आहे, म्हणून ही मस्ती चालली आहे… बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे अवघा महाराष्ट्र जाणतो…
दिल्लीचे बूट चाटणे, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे, हे मोठं कार्य असेल तर शिंदे गट ते करत आहे… आम्ही स्वाभिमानाने उभे राहिले आहोत… अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आमचे काय संबंध होते, हे यांनी समजून घेतले पाहिजे… आता जे कोणी हे फडफडत आहेत ते पाळलेले पोपट आहेत, त्यांना मनमोकळेपणाने बोलण्याचा अधिकार नाही… यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची पार शकलं उडवून महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केले आहे…