मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्या होणाऱ्या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणावर प्रश्नचिन्ह…

0
43

 

नवी मुंबई  शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

खारघर येथे इस्कॉन ट्रस्टद्वारे उभारण्यात आलेल्या श्री राधामोहन मंदिराचे उद्या बुधवारी १५ जानेवारी २०२४ रोजी होणारे लोकार्पण सिडकोकडून प्राप्त होणाऱ्या भोगवटा प्रमाणपत्रावर अवलंबून आहे. जोपर्यंत सुधारीत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र सादर होत नाही तोपर्यंत इस्कॉनचे अनधिकृत बांधकाम नियमित होणे शक्य नाही.
येथील मा. पंतप्रधानांच्या दौऱ्याला एकच दिवस शिल्लक असल्याने सिडकोसह वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा कुठल्याही परिस्थितीत आज, मंगळवारी भोगवटा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरू आहे.