रायगड शिवसत्ता टाइम्स(वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडगाव येथील मराठा समाज मंदिर पाडल्याने येथील मराठा समाज बांधव आक्रमक झालेत… दोन अंगणवाड्या असताना मराठा समाज मंदिर पाडून पुन्हा तिसरी अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप वडगाव ग्रामस्थांनी केलाय… आपल्याला न्याय मिळावा यासाठी येथील मराठा समाज बांधवांनी तालुका व जिल्हा स्तरावर संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केलाय… मात्र प्रशासनाचे दुर्लक्षित व अन्यायकारक धोरण मारक ठरतं असल्याचे येथील ग्रामस्थ महिलांनी सांगितले… मराठा समाज मंदिर पाडून तिथं अंगणवाडी तयार करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे उपअभियंता पेण यांनी सांगितले. तर अंगणवाडी इमारतीच्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे पत्र पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे, मात्र यापूर्वी उपअभियंता यांनी काम न करण्याचे पत्र दिले असताना दुसरीकडे गटविकास अधिकारी यांनी काम करण्यात यावे असे पत्र दिले होते, त्यामुळे वडगाव ग्रामस्थानी मराठा समाज मंदिर वाचविण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी जोरदार मागणी मराठा बांधवांनी केलीय…