शिवसत्ता टाइम्स संदेश पेडणेकर श्रीवर्धन
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन वडवली येथे संदीप क्रीडा मंडळ वडवलीतर्फे आमदार चषक 25 वा क्रीडा महोत्सव श्रीवर्धन कब्बडी असो मर्यादित साजरा करण्यात आला… यावेळी उद्घाटन मयुरेश खेऊर यांच्या हस्ते पार पडले दीप प्रज्वलन रवींद्र मांजरेकर संतोष मांजरेकर श्यामजी धुमाळ सुरेश धुमाळ कृष्णकांत पिलणकर यांच्याहस्ते झाले… कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कब्बडी पट्टू श्री.सदानंद खेऊर यांच्या हस्ते नारळ फोडून कबड्डी स्पर्धा सुरवात झाली… या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 16 संघाने भाग घेतला होता… खेळाडू माजी कब्बडी पट्टू सून किर, संदेश किर, दिनेश शिरवटकर, प्रणय पेडणेकर, पप्या खेऊर यांनी कब्बडी सामने यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेऊन कब्बडी चांगल्या पद्धतीने पार पडली… या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवर देव आणि गावदेवी राईडरस यांनी कब्बडी स्पर्धेमध्ये रंगत आणली… अंतिम फेरीतील विजेता संघ म्हणून गावदेवी राईडरस विजयी संघ म्हणून घोषित ठरला… यावेळी विजेत्या संघांचे अभिनंदन करण्यात आले तसेच कबड्डीचे प्रथम पारितोषिक गावदेवी राईडरस या संघाला माजी कब्बडी पट्टू मुरूदास तोंडळेकर यांच्या हस्ते देण्यात आले…