१२ व्या मजल्यावर घर…कडक सिक्युरिटी मग घरात चोर घुसतो कसा?…बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान संदर्भात धक्कादायक माहिती… 

0
57

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे ):-

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात काल चोरीचा प्रयत्न झाला…यावेळी सैफवर तब्बल सहा वार करण्यात आले. मानेवर, पाठीवर गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत त्याला लिलावाची रुग्णालयात नेण्यात आले.मात्र आता या प्रकरणी आता जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे…पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातील मोलकरणीनेच हल्लेखोरास घरात एन्ट्री दिली होती असे समजते आहे…या प्रकरणी आता पोलीसांनी घरातील अन्य तिने मदतनीस कामगारांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.त्यावरून कळतंय की ही व्यक्ती घरातील मोलकरणीलाच भेटण्यासाठी आली होती. करीना कपूर हिच्या मदतनीस स्त्रीने त्याला घरी एन्ट्री दिल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यांच्यातील भांडणाच्या आवाजाने सैफ जागा होऊन मध्ये पडल्यावर त्या घुसखोर व्यक्तीने सैफवर रागारागातच हल्ला केला.महिला मदतनीसनेच त्या व्यक्तीला घरात एन्ट्री दिली होती आणि तिला भेटण्यासाठीच तो व्यक्ती घरात आला होता हे पुढे आल्यावर तो इसम कोणत्या मार्गाने घरात आला याचा आता पोलीस कसून तपास करीत आहेत. इमारतीच्या मागून आला की पुढून हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीसांनी बिल्डींगचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केलंय त्यामुळे आता महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
ही घटना घडली तेव्हा बेबो (सेटची पत्नी करीना कपूर) घरी नसल्याची बातमी आहे. ती तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. बेबो रात्री सोनम आणि बहिण करिष्मा कपूर, रिया कपूर यांच्या सोबत “गर्ल नाईक” एन्जॉय करत होती त्यावेळी जेह आणि तैमूर सैफ अली सोबत घरी होते…