उबेर ओलावर कठोर कारवाई न झाल्यास 26 जानेवारीला आंदोलन… शासनाला मिळणारा महसूल जातो अधिकाऱ्यांच्या खिशात?  

0
49

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

उबेर ओला या वाहनावर कठोर कारवाई न झाल्यास रायगड जिल्ह्यात अन्यायाविरुद्ध पोटासाठी रायगड पॅटर्न सुरु झाल्यास याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे रायगड जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी म्हटले आहे…  एक तास RTO ऑफिसच्या जवळच असणाऱ्या खारपाडा टोल नाक्यावर तपासणी केली असता 38 उबेर ओला वाहनावर मोठया प्रमाणावर दंडात्मक कारवाई होऊन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होतो तर अशी कारवाई त्यांच्यावर होऊ नये असे कोणाचे आहे अभय? रायगडमधील परमिट धारकाला चारित्र्य पडताळणी दाखला असणे बंधनकारक आहे, मात्र परप्रांतीय परमिट धारक खोटे लायसन्स न भरलेले टॅक्स, बॅच नसलेला पण तो प्रवाशी वाहतूक उबेर व ओला कंपनीचे ड्रायवर यांची जाणीवपूर्वक तपासणी न करणे म्हणजे काय समजावे?….

रायगडमधील स्थानिक टॅक्सीचालक काही मार्गांवर अनेक वर्ष प्रवाशी वाहतूक करीत आहेत, मात्र महाराष्ट्र सरकारने ST मध्ये 50% महिलांना प्रवास सवलत कोणतेही निकष न ठेवता दिली आहे… त्यामुळे पूर्ण व्यवसाय उध्वस्त झाला आहे… त्यातच आता परप्रांतीय उबेर ओला कंपनीच्या अनधिकृत व्यवसायामुळे विक्रम मिनिडोअरचे व्यवसाय पूर्णपणे नामशेस होण्याच्या मार्गांवर आहे… उबेर ओला या वाहनावर कठोर कारवाई न झाल्यास रायगड जिल्ह्यात अन्यायाविरुद्ध पोटासाठी रायगड पॅटर्न सुरु झाल्यास याचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात तसेच 26 जानेवारीला आंदोलन करणार असे रायगड जिल्हा अध्यक्ष विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेचे विजय भाऊ पाटील यांनी सांगितले…