वेद जनजागृती मंच आयोजित मॅरेथॉन स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा… 

0
44

महाड   शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :- 

सुमारे आठ वर्षांपूर्वी वेद जनजागृती पंच संस्थेची स्थापना करण्यात आली होती… निसर्गाच्या सुदृढ आरोग्या  बरोबरच मानवाच्या सदृढ आरोग्याचा संदेश देत विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेली संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संस्था असून, या सर्व उपक्रमातून पर्यावरण संवर्धन हा मुख्य उद्देश ठेवला आहे… व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी महाड येथे महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन संस्था करीत असते… या स्पर्धेतून एक मूल एक झाड असा महामंत्र देत प्रत्येकाने आपल्या घरोघरी एक तरी झाड जपले पाहिजे असा संदेश संस्थे व संस्थेचे पदाधिकारी देत असतात… हा संदेश दरवर्षी 5000 झाडे लावण्याचा संकल्प संस्थेने केला असून, ही झाडे आदिवासी वाडी, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा आणि वेगवेगळ्या ग्रामस्थांच्या भेटीसाठी घेऊन जनप्रबोधन करून त्याने झाडे वाटप करण्यात येतात… आठ वर्षांमध्ये 14000 झाडे आदिवासी व शाळांच्या मदतीने लावलेली आहेत… या लावलेल्या झाडांचा 2019 ला सर्वे केला असून, त्यातून 70 टक्के झाडे चांगल्या प्रकारे जगली असल्याचे निदर्शनास आले… कोविड-19 च्या कालावधीत हजार रुपये घर कामगार तिवारी आदिवासी लोकांना अत्यावश्यक  किराणा किट, सॅनिटायझर, कापडी मास्क वाटप करण्यात आले आहे… यावर्षी सध्या विविध उपक्रमाने मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे… या स्पर्धेसाठी व पुरस्कारासाठी नावे नोंदविण्याचे आवाहन व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गीते यांनी केले आहे…