माणगांव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
राज्यभरातून अल्पवयीन मुली-तरुणी आणि विवाहित महिलासुद्धा घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या नोंदीतून समोर आले आहे… माणगाव तालुक्यात देखील तरुणी व विवाहित महिलांच्या मिसिंगच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे…१३ जानेवारी २०२५ रोजी माणगाव तालुक्यातील हरवंडी कोंड येथील तरुणी नवनिता कदम ही कामावर जाते सांगून घराबाहेर गेली ती अजून घरी परतलीच नाही…ही घटना ताजी असतानाच माणगावमधून पुन्हा एक विवाहिता मिसिंग झाल्याची घटना घडलीय…दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी एक विवाहिता मिसिंग झाल्याची घटना घडली असून याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे… सदरची माहिती अशी की मिसिंग व्यक्ती दिनेशा दिनेश खिडबिडे वय वर्ष 35 राहणार पेण तळे तालुका माणगाव ही साड्यांना फॉल ब्लिडीग करण्यासाठी जाते असे सांगुन घरात निघून गेली ती अद्यापपर्यंत घरी परतलीच नाही…आजूबाजूच्या परिसरात, शेजारील गावात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता अद्याप पर्यंत मिळुन आली नाही..सदर मिसिंग व्यक्तीचे नाव दिनेशा दिनेश खिडबिडे असून चेहरा गोल, उंची सुमारे ५ फुट रंग गोरा, कंस काले व लांब, अंगाने मध्यम, अंगात नेमुम हिरव्या रंगाची साडी, पायात काळया संन्डल, गळ्यात काळमणी गंठण,अशा वर्णनाची असून निदर्शनास आल्यास माणगाव पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे…याबाबत पती दिनेश खिडबिडे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निवृत्ति बोराडे यांच्यासह पोलीस रावसाहेब कोळेकर करीत आहेत…