नवीन प्रास्ताविक “बारामती”  जिल्ह्यासाठी हालचाली सुरू…  नव्या परिक्रमानुसार असा असेल नवीन प्रास्ताविक “बारामती” जिल्हा…

0
40

शिवसत्ता टाइम्स देवेंद्र मोरे मुंबई 

नवीन बारामती जिल्हात भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर, खंडाळा, फलटण आणि कोरेगांव हे एकूण आठ तालुके समाविष्ट असतील… पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पुनर्रचेतून प्रास्ताविक बारामती जिल्ह्यासाठी जोरदार हालचाली सरकारकडून सुरु झाल्या आहेत… मुख्यमंत्री मा‌.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजीतदादा पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे… बारामती, शिरूर व माढा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांचा समावेश करून बारामती जिल्ह्या केला जाणार आहे… यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पुर्व भाग म्हणजे भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर  तसेच सातारा जिल्ह्यातील पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पुनर्रचेतून प्रास्ताविक बारामती जिल्ह्यासाठी जोरदार हालचाली सरकारकडून सुरु झाल्या आहेत…

बारामती, शिरूर व माढा लोकसभा मतदारसंघातील काही तालुक्यांचा समावेश करून बारामती जिल्ह्या केला जाणार आहे… यात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पुर्व भाग म्हणजे भोर, पुरंदर, शिरूर, दौंड, इंदापूर  तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगांव व खंडाळा यांचा समावेश असणार आहे…
बारामती जिल्हा पूरक अशा बाबींमध्ये..
१. महावितरणचे विभागीय मुख्याधिकारी कार्यालय
२. स्वतंत्र परिवहन महामंडळ कार्यालय
३. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय

याचबरोबर “बारामती” जिल्हा शोभेल असे सर्व बाजूंचे चौपदरी रस्ते, विमानतळासाठी जागा, मेडिकल कॉलेजसह शैक्षणिक हब, कृषी हब, सर्व क्षेत्रातील नामवंत सोने व्यापारी, हॉटेल्स, कापड दुकानदार, गाडी विक्रेते, औद्योगिककरणाचे जाळे, बारामती शहरातील रिंग रोड, एकूण २७ बाग-बगिचे येथे उपलब्ध आहेत… आता फक्त बारामतीला जिल्हा मानांकन देऊन जाहीर करण्याचे तेवढे बाकी आहे…
याविषयी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांपैकी काहीजणांची सकारात्मक नकारात्मक अशा दुहेरी भूमिका असल्या तरी निर्णय सकारात्मकच होणार हे नक्की, नाहीतर “बारामतीकर” कसले ? फक्त प्रजासत्ताक दिनाचा अवसर तेवढा बाकी हे नक्की…
बारामती जिल्हा निर्मितीमुळे पुर्वीच्या अनेक तालुक्यांतील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे… यामध्ये काही तालुक्यांची राजकीय कुरघोडी, डावपेच करून दबावात ठेवण्यासाठी तर काही तालुक्यांचा फायदा देखील होणार आहे… यामध्ये सकारात्मक नकारात्मक अशा दोन्ही चर्चा सध्या जोरात आहेत…