मंत्री आदितीताई तटकरे यांचे हुतात्मा स्मृती स्थळास अभिवादन… जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने दौरा…

0
105

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

ना.मंत्री आदितीताई वरदा सुनिल तटकरे, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी शुक्रवार दिनांक १७/१/२०२५ रोजी रायगड जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने दौरा केला…सकाळी ११:४५ वाजता पागोटे, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे आदितीताई तटकरे यांचे आगमन झाले… यावेळी त्यांनी लोकनेते कै.दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जमीन बचाव आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली… त्यानंतर जासई येथील हुतात्म्यांच्या स्मृती स्थळास भेट देऊन अभिवादन केले… सदर प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस भार्गव पाटील, उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला तालुका अध्यक्ष कुंदाताई ठाकूर, शहर युवक अध्यक्ष समत भोंगले, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, दिनेश पाटील, सनी म्हात्रे, त्रिकाल पाटील, स्वप्नील कुंभार, दिपराज ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते…