रायगड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची आविष्कार भरारी… नागपूर येथे दौरा… 

0
110

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम) :-

रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची अविष्कार भरारी घेऊन राष्ट्रीय अविष्कार अभियानातून नागपूर येथे भेट दिली…  या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे….
रायगड जिल्हा परिषद आयोजित, केंद्रीय प्रकल्पांतर्गत समग्र शिक्षा २०२४/२५ राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या राज्यांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन नागपूर येथील रामण विज्ञान केंद्र व तारामंडळ, नागपूर येथे करण्यात आले होते.. या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या ६ शाळांची निवड करण्यात आली होती…  मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम व विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव ता.खालापूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोदे पाचनंद पनवेल, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मेढेखार अलिबाग, रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेणवई रोहा, रायगड जिल्हा परिषद शाळा, चरई पोलादपूर व रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नवघर सुधागड या शाळेतील एकूण ४३ विद्यार्थी व शाम लवंगारे शाळा-चरई, श्रीम.योगिनी वैदू शाळा तळोदे पाचनंद, सौ.शिल्पा सुर्वे शाळा, शेणवई रोहा, सौ.मनीषा अंजर्लेकर शाळा मेढेखार अलिबाग, श्रीम.अनुजा माने शाळा नवघर पाळावी सुधागड या शिक्षकांची निवड करण्यात आली होती… सुभाष राठोड, शाळा वडगाव यांची या सहलीसाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती… सहलीदारम्यान विद्यार्थ्यांना रामण विज्ञान केंद्र व राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाली… यावेळी तारामंडळाची रचना, निर्मिती यावर 3D शो दाखवण्यात आला… नागपूर येथील दिक्षा भूमी, ताजबाग, महाराज बाग प्राणिसंग्रहालय सफर अशी विविध प्रेक्षणीय व पर्यटनाचा आनंद मुलांनी लुटला… या कार्यक्रमाच्या प्रमुख पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद यांनी सहली दरम्यान सतत संपर्कात राहून सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले… तसेच उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे यांनी सुद्धा विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले…
विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन वृंधीगत करण्यासाठी ही एक पर्वणीच होती… मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अशा सहलीचे आयोजन महत्त्वाचे आहे… केंद्रीय प्रकल्पांतर्गत MPSP च्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते… सर्व मुलांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन पुनीता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी केले….