कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
कर्जत विधानसभा मतदारसंघातील सीबीसी लॉन येथे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या वतीने महायुतीच्या नवनिर्वाचित मंत्री, खासदार आणि आमदारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नामदार प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्यमंत्री), आमदार भरतशेठ गोगावले (रोजगार हमी मंत्री), रवीशेठ पाटील (आमदार, पेण विधानसभा), श्रीरंग आप्पा बारणे (खासदार, मावळ लोकसभा),राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, (अलिबाग विधानसभा मतदार संघ) विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार ही करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी आप्पा बारणे यांनी सत्कार सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याचे कौतुक व कौतुकांचा वर्षाव केला… “संघर्षातून माणूस मोठा होतो, आणि प्रत्येक संघर्ष माणसाला नवीन गोष्टी शिकवतो. महेंद्रशेठ, तुम्ही कर्जत-खालापूर तालुक्यासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे…तुम्ही प्रामाणिकपणे विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी विकासाची दिशा निश्चित केली आहे…या कार्यक्रम प्रसंगी भरत गोगावले रोजगार हमी मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्री यांनी आपल्या निष्ठेचा उल्लेख करत, “मी पदासाठी राजकारण केले नाही. माझे काम जनतेसाठी असून शिवसेनेच्या विचारधारेशी प्रामाणिक राहणे, हेच माझे ध्येय आहे,” असे सांगितले व येणाऱ्या काळात कर्जत खालापूर मतदार संघाच्या विकासासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कर्जत व नेरळ येथे आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी ठोस पावले उचलले जातील असे प्रतिपादन केले व “मी स्वतः उद्घाटनासाठी येथे येईन,” असे सांगत त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळण्याचे वचन दिले. या कार्यक्रम प्रसंगी श्री धैर्यशील पाटील, राज्यसभा खासदार अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र दळवी, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर कर्जत मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे आभार मानतो. “कर्जत येथे 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय आणि नेरळ येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” व संपूर्ण कर्जत खालापूरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले जाईल असे महेंद्र थोरवे प्रतिपादन केले. तसेच महायुतीची एकजूट आणि विकासाचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प सोहळ्यात व्यक्त केला… या कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते