श्रीराम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला १ वर्ष पूर्ण…”स्मृती सेतू” ही व्याख्यानमालेचे आयोजन…

0
35

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात नेत्रदीपक असा राम लल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना दिवसाला बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे… अयोध्येतील हे राममंदिर म्हणजे समस्त भारतवर्षासाठी सुखद स्वप्नपूर्ती आहे… या अद्भुत सोहळ्याची आठवण चिरकाल रहावी यासाठी सकल हिंदू समाज आणि अक्षय प्रतिष्ठान-दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने “स्मृती सेतू” ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे… ‌

अयोध्येतील या संस्मरणीय सोहळ्याच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून दि.२१ आणि २२ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षातर्फे दापोलीतील केळसकर नाका येथे “स्मृती -सेतू” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, असे समाज माध्यमांशी बोलताना आयोजकांनी विषद केले… व्याख्याते श्री. आशिष भारतवंशी हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यामध्ये “बटे थे इसलिये कटे थे” आणि उजवे खलनायक, डावे खलनायक (रावण आणि कर्ण) असे विषय असणार आहेत… हे व्याख्यानमालेचे पहिलेच वर्ष आहे, वेगळे विषय समजून घेण्यासाठी आणि आपल्या विचारांना एक नवीन दिशा देण्यासाठी या व्याख्यानमालेस सर्वांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे समस्त दापोलीकरांना आयोजकांनी आव्हान केले आहे…. सायंकाळी ७.०० ते ८.३० स्थळः केळसकर‌ नाका, दापोली येथे होणार आहे… पहिल्याच वर्षी आशिष भारतवंशी यांच्यासारखे सुप्रसिद्ध व्याख्याते या व्याख्यानमालेच्या आयोजनास लाभले आहेत हा पण एक महत्त्वपूर्ण योगायोग आहे… या व्याख्यानमालेचे हे पहिलेच वर्ष असून यापुढे प्रती वर्षी याच दिवशी म्हणजे दि. २१ आणि २२ जानेवारी रोजी म्हणजे अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा स्मृती दिनाच्या दिवशीच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे… त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी श्री रामलल्लांच्या महाआरतीने या व्याख्यानमालेला आरंभ होईल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना आयोजकांनी सांगितले आहे…