रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रायगड जिल्ह्यात एकेकाळी अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँक थकीत कर्जदारांमुळे बुडीत निघाली होती…यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाले होते. यामुळे गोरगरीब होरपळून निघाले होते. आज बँक चालू होईल उद्या बँक चालू होईल या आशेवर ठेवीदार होते. असे असताना निविदा प्रक्रियेतून रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेची मुख्य इमारत विकण्यात आली आहे. रोहा अष्टमी अर्बन बँक इमारत विक्रीचे व्यवहार नियमबाह्य असून ही इमारत अल्प किमतीत विकली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील एका खरीदारांचे नातेवाईक थकबाकीदार आहेत.अल्प किमतीत ही इमारत डिफॉल्टर असलेल्या नातेवाईक बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप रोहा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत समीर शेडगे, नितीन परब व अमित घाग यांनी केले आहे.यावेळी राजेश काफरे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते…या इमारतीच्या विक्रीची निविदा नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आले असल्याचे या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले…निविदा ४ ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात आले असून २४ ऑक्टोबर पर्यंत निविदा प्रक्रिया असताना २३ ऑक्टोबरलाच ही प्रक्रिया केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निविदा प्रक्रियेत या इमारतीची किंमत ९९,७८००० एवढी किंमत ठरवण्यात आली आहे. इमारत रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या इमारतीची किंमत कितीतरी पटीने जास्त आहे. ३.८० गुंठा जागेवर उभी असलेली इमारत अल्प दरात १ कोटी दहा लाख एवढ्या किमतीत ही इमारत निविदा प्रक्रियेतून विकण्यात आले असल्याचे सांगितले. या इमारतीचे ६ जानेवारीला खरेदी खत झाले आहे. हे खरेदीखत रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. यासाठी सगळ्या रोहेकरांनी एकत्रित यावे असे आमचे आवाहन आहे…अनेक निवडणुका या बँकेच्या जीवावर झाल्या आहेत. तर काही निवडणुकीच्या प्रचार दरम्यान ही बँक चालू करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बिल्डरच्या घशात रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत चुकीचे टेंडर प्रोसेस करून घालण्यात आली आहे. या संबंधित आम्ही रोहेकर म्हणून कोर्टात जाणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.शासकीय नियमांची पायमल्ली करून व्यवहार करण्यात आलेला आहे, त्यामुळे या व्यवहाराला स्थगिती मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे अमित घाग यांनी सांगितले…भाजप प्रदेश कार्याध्यक्ष व कोकणचे नेते रविंद्र चव्हाण, खा. सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे, आ. प्रशांत ठाकूर यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी लक्ष घालून रोहा अष्टमी अर्बन बँक विक्री निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी रोहेकर करीत आहेत.