माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी माणगाव पोलीस ठाणे, कचेरी रोड, मोर्बा रोड नाका, मुख्य बाजारपेठ, निजामपूर रोड नाका, निजामपूर रोड, कालवा रोड, तहसील कार्यालय आणी विकास कॉलोनी रोड असा रूट मार्च व फ्लॅग मार्च गुरुवार दि.२३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता… या रूटमार्चचे नेतृत्व 102 बटालियन, द्रुत कार्य बल (RAF) चे सहायक कमांडंट अजीत कुमार अण्णा क्षीरसागर यांनी केले… त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी धनंजय गुजर, आणि 33 कर्मचारी तसेच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी साहेब व माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, एपीआय भोसले, एपीआय बेलदार, पीएसआय काळे व 21 अमलदार सहभागी झाले होते… या फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे आणि नागरिकांना पोलीस प्रशासन व द्रुत कार्य बल तत्परतेचा संदेश देणे हा होता… या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन समाजातील विश्वास दृढ झाला आहे… माणगाव पोलीस ठाणे व द्रुत कृती दलाचा हा समन्वित प्रयत्न लोकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे व जनतेतून समाधान व्यक्त होत आहे…