पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे यांचा म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्यावतीने सत्कार…

0
61

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

पनवेल महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने एका आठवड्यात नोकरीमध्ये सामावून घेतल्या बद्दल पनवेल महानगर पालिका आयुक्त श्री मंगेश चितळे यांचा म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या वतीने दिनांक  ३१ जानेवारी रोजी पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, युनियनचे कार्याध्यक्ष श्री संतोष पवार, सरचिटणीस श्री अनिल जाधव, कोषाध्यक्ष श्री दत्तगुरू म्हात्रे आणि उपस्थित कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल  महानगर  पालिकेचे गट नेते परेशशेठ ठाकूर, नितीन पाटील, डॉ अरूणशेठ भगत हे उपस्थित होते.

राज्यातील सफाई कामगारांच्या वारसांना मा. उच्च न्यायालय – औरंगाबाद खंडपीठातील निर्णयानुसार तसेच मा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासन निर्णयानुसार सहा आठवड्यात नोकरी देण्या संदर्भात सुस्पष्ट आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्या प्रमाणे गेले काही वर्षे प्रलंबित असलेल्या वारसांना जलदगतीने नोकरीत सामावून घेतले जाईल हे अपेक्षित होते या प्रमाणे काही तुरळक ठिकाणी कार्यवाही सुरु झाली आहे. या आदेशाचे पालन अतिशय जलद गतीने करणारे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे यांचा सत्कार करण्याचे कारण आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी ही कार्यवाही अतीशय जलद गतीने करून या सफाई कामगारांच्या वारसांचे न भरुन  निघणारे नुकसान टाळले आहे. ही सफाई कामगारांच्या महत्त्वपूर्ण साफसफाईच्या कामाचे / कामगीरीचे महत्व जाणून जी संवेदनशीलता प्रत्यक्ष कृतीतून दाखविली त्याबद्दल हा यथोचित व योग्य व्यक्तीमत्वाचा  म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यांचे अनुकरण खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व महा नगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी यांनी करण्याची आवश्यकता आहे असे मत कामगार नेते संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांनी व्यक्त करुन आयुक्त श्री मंगेश चितळे यांचे अभिनंदन केले…