विभागीय तांत्रिक तज्ज्ञांची अलिबाग नगरपरिषदेला भेट… अलिबाग नगरपरिषदने माझी वसुंधरा अभियानाची घेतली माहिती…

0
38

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

माझी वसुंधरा अभियान ३ व ४ मध्ये कोकण विभागात सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे…त्या अनुषंगाने नगरपरिषदेने माझी वसुंधरा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची माहिती जाणून घेण्यासाठी विभागीय तांत्रिक तज्ज्ञ मंदार पाटील, प्रशासन शाखा, ‘विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग यांच्याकडून प्रत्यक्ष भेट दिली…नगरपरिषदेने माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पाणी पूरवठा अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता निरीक्षक व शहर समन्वयक यांच्या समवेत नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमाची पाहणी करून कौतुक केले…अलिबाग नगरपरिषदेचे माझी वसुंधरा अंतर्गत असलेले काम हे उच्चतम असून बक्षीस पात्र असल्याचे सांगितले… माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चांगले गुण व बक्षीस प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्याच्या मार्फत देण्यात आल्या जसे की दिशादर्शक फलक बनविणे, ज्येष्ठ नागरिकांना माझी वसुंधरा अभियानाची माहिती देणे, शहरामध्ये बांबू व शेवगा लागवड करणे, सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे, शहरातील पेट्रोल पंप व्यावसायिक यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे, शहरात होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझी वसुंधरा अभियानाची प्रचार प्रसिद्धी करणे व हरित शपथ घेणे, शहरकरिता अभियानाअंतर्गत CSR फंड उपलब्ध करून घेणे अशा विविध मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या…माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरणातील संरक्षण करण्यासाठी भूमी, वायु,जल,अग्नी व आकाश या पाच पंचतत्वांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. माझी वसुंधरा ५.० अंतर्गत हरिथ शपथ नगरपरिषदेमार्फत घेण्यात आली…