उरण तालुक्यातील चिरनेर,म्हातवली,बोकडविरा,सोनारी महागणपती मंदिरात भाविकांची तुफान गर्दी… हजारो भाविकांनी घेतले श्री महागणपती दर्शन…

0
136

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):- 

श्री. गणेश जयंती सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर, म्हातवली (सिद्धिविनायक सोसायटी),बोकडविरा,सोनारी,उरण शहरातील श्री महागणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री गणेश जयंती सोहळा हा शनिवारी दिनांक १  फेब्रुवारी रोजी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते.यावेळी श्रीच्या भक्तीमय वातावरणात मंदिर परिसर दुमदुमून गेले होते. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा चिरनेर,बोकडविरा सोनारी गावातील श्री महागणपती देवस्थानची ख्याती दुर वर पसरल्याने शनिवारी दिनांक १ फेब्रुवारी रोजी उरण बरोबर पनवेल, नवीमुंबई, मुंबई,ठाणे, कल्याण, डोंबिवली,पेण, अलिबाग परिसरातील अबालवृद्ध आप आपल्या कुटुंबासह श्रींच्या दर्शनासाठी तसेच आपले नवस फेडण्यासाठी ये- जा करत होते.श्री गणेश जयंती सोहळ्यानिमित्त उत्सव कमिटीच्या वतीने श्री चा अभिषेक,भजन तसेच ह.भ.प.श्री हर्षल जोगळेकर (पुणे) यांचे श्रींच्या जन्माचे सुश्राव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले .