श्री सिध्दिप्रियाय मित्र मंडळाकडून श्री गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा… जन्मोत्सव सोहळ्याला अनिकेत तटकरेंची भेट…  

0
41

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

शनिवार १ फेब्रुवारी श्री गणेश जयंती निमित्ताने पेण शहरातील समिश्र नगर येथील श्री सिध्दिप्रियाय मित्र मंडळाकडून श्री. गणेश जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला…. यावेळी माजी आमदार तथा युवा नेते अनिकेतभाई तटकरे, उद्योजक राजुशेठ पिचिका यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले… अनिकेत तटकरे यांनी मंदिरा समोरील सभामंडपासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिल्याने तसेच प्रसिध्द उद्योजक राजुशेठ पिचिका यांनी सभामंडपातील संपूर्ण लादी देऊन सहकार्य केल्याने त्यांचे मंडळाकडून शाल श्रीफळ देऊन आभार व्यक्त करण्यात आले… श्री. गणेश जन्मोत्सव सोहळया निमित्ताने पनवेल श्रीक्षेत्र पाटणोली धाम येथील हरिभक्त श्री महेशजी महाराज साळुंखे यांचे पारायण तसेच भजन किर्तन, महाप्रसाद, हळदी कुंकू, सत्यनारायणाची पूजा, आरती असे कार्यक्रम सोहळ्या प्रसंगी ठेवण्यात आले होते… मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला… यावेळी माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ पिचिका, रविंद्र पाटील, राकेश म्हात्रे, प्रसाद पाटील, विकास म्हात्रे, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, विलास पाटील, महेश म्हात्रे, चंद्रकांत लांगी आदि गणेश भक्तांनी दर्शन घेतले…