अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात… कांद्याची काढणी, वेण्‍या बनवण्‍याचे काम सुरू…

0
47

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

वेगळी चव आणि औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध असलेला पांढरा कांदा आता बाजारात आलेला आहे… पांढऱ्या कांद्यांच्‍या काढणीचे काम सध्‍या वेगात सुरू असून, वाळलेल्‍या कांद्याच्‍या वेण्‍या बनवण्‍याचे काम सुरू झाले आहे… यातून महिलांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्‍ध होत आहे… व्‍यापारी शेतकरयांच्‍या बांधावर येवून कांद्याची उचल करीत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळतो आहे… अलिबाग तालुक्‍याच्‍या काही भागात अवघ्‍या 250 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते… या कांद्याचे क्षेत्र वाढवण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाने प्रयत्‍न सुरू केले आहेत… स्‍वतः जिल्‍हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेत पांढऱ्या कांद्याच्‍या बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे… त्‍यासाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातून निधीदेखील उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे…