महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
नायक मराठा समाज सेवा संघ, विन्हेरे विभागाकडून फाळकेवाडी येथील येथे रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता. या आशयाचा बॅनर विन्हेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सानेवरती लावण्यात आला होता मात्र रात्री अज्ञातांकडून हा बॅनर फाडल्याने विन्हेरे विभागासहित महाड तालुक्यात या घटनेचा निषेध करून आणि विरोधात कारवाई करण्याची मागणी मराठा नायक समाजाने केली आहे नायक मराठा समाज सेवा संघ विन्हेरे विभागामार्फत फाळकेवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये रविवार २ फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता… यासाठी महाड सह तालुक्यातील विविध विभागातून मोठ्या प्रमाणावर महिला या कार्यक्रमासाठी येणार होत्या, त्यासाठी विन्हेरे येथील झोलाई मंदिराच्या सानेवर हा बॅनर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लावण्यात आला होता… मात्र शुक्रवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा बॅनर फाडून पळवून नेला.
याबाबतची घटना शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात निषेध करीत महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा तपास लावण्याचे काम पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याबाबत विन्हेरे येथे नायक मराठा समाजाच्या वतीने बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला व महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. या बैठकीसाठी तालुका उपाध्यक्ष-सिताराम कदम, पांडुरंग पवार, अध्यक्ष-सुरेश सपकाळ, उपाध्यक्ष-नामदेव साळुंखे, उपाध्यक्ष-प्रभाकर गायकवाड, उपाध्यक्ष-अनंत सावंत, सचिव-संदीप वारंगे, सदस्य-बाळकृष्ण जाधव खजिनदार-उमेश फाळके, फाळकेवाडी सरपंच-नागेश फाळके, विजय शिंदे, तालुका कृषी समिती-अध्यक्ष किशोर फाळके, माजी जि. प. सदस्य-निलेश ताठरे, विन्हेरे सरपंच-चंद्रकांत मोरे, पांगरीचे माजी-सरपंच राजेंद्र मोरे, ताम्हणे गावचे माजी सरपंच-सुनील बोरकर इत्यादी सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीनंतर निषेध व्यक्त करून संबंधित व्यक्तीला तात्काळ शासन करण्याची मागणी तालुका पोलीस ठाण्याकडे केली आहे.