रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
चांभालीऀ ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच,कामगार नेते तथा अल्पावधीतच उद्योजक क्षेत्रात नावारूपाला आलेले चांभार्ली गावचे सुपुत्र अशोक भाऊ मुंढे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. अशोक भाऊ मुंढे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि.१ फेब्रुवारी रोजी ११ वा. रसायनी-दापिवली येथील बी.पी.सी.एल. कंपनीच्या गेट समोर रसायनी पाताळगंगा माथाडी आणि जनरल कामगार संघटना युनियनच्या नामफलकाचे अनावरण सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपानराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर खाने-आंबिवली येथील राजाश्रय वृद्धाश्रमात अल्पोपहारचे वाटप करण्यात आले. सायंकाळी रसायनी पाताळगंगा माथाडी आणि जनरल कामगार संघटना (युनियन) च्या चांभालीऀ येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक भाऊ मुंढे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा जनता विद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला होता वाढदिवसाचे औचित्य साधून रसायनी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील हरी भक्त परायण ( ह.भ.प.) कीर्तनकार महाराज तसेच चांभालीऀ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच विद्यमान सदस्य आणि परिसरातील पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अशोकभाऊ मुंढे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पंचक्रोशीतील समाज प्रबोधन करणारे वारकरी मंडळी, अन्याया विरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवणारे पत्रकार बांधव तसेच लोकप्रतिनिधींचा सत्कार केल्याने साऱ्यांनीच अशोक भाऊ मुंढे यांचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हातून यापुढेही असेच समाजकार्य घडत राहो असा आशावाद व्यक्त करत वारकरी मंडळींसह ज्येष्ठांनी अशोकभाऊंना आशीर्वाद दिला. जनता विद्यालयाच्या भव्य मैदानावर रात्री अजित मिस्री प्रस्तुत स्टार टाईम हिंदी मराठी गीतांचा बहारदार नजराणा यावेळी सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री बिग बॉस फिल्म माझ्या नवऱ्याची बायको या सिरीयल मध्ये भूमिका बजावणाऱ्या रुचिरा जाधव तर प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना वंदना पांचाळ यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. अशोकभाऊ मुंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितमशेठ म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महिला बालकल्याण सभापती- निता माळी, माजी नगरसेविका-राजश्री वावेकर (पनवेल) प्रसिद्ध उद्योजक-तुकारामशेठ दुधे, मा.सरपंच-संदीपशेठ मुंढे, कृष्णाशेठ पारंगे, माजी सभापती रमेश पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-प्रकाशशेठ गायकवाड, तारामती ब्रिगेडच्या शिवमती वंदना मोरे, शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख वैजयंती ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाच्या) रायगड जिल्हा महिला अध्यक्षा-दीपिका भंडारकर, समता परिषदेच्या-श्रीमती. संतोषी मोरे, ग्राम सुधार मंडळाचे कार्याध्यक्ष-सुदामशेठ मुंढे, सचिव-तात्यासाहेब म्हसकर, जनता विद्यालय इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य-वारे सर, ज्येष्ठ नेते प्रमोद राईलकर, सुभाष आहिर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, वैद्यकीय व क्रिडा क्षेत्रातील मंडळीं बरोबरच परिवारातील सदस्य व त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित राहून अशोकभाऊ मुंढे यांना शुभेच्छा दिल्या.