माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
माणगाव बाजारपेठ मधील अतिक्रमण विरोधात माणगाव नगरपंचायतने बेधडक पणे मोहीम राबविली आहे, पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात नगरपंचायत ने ही कारवाई बेधडकपणे राबवली आहे माणगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी संतोष माळी ॲक्शन मोडवर आले आहेत.
माणगाव बाजारपेठ मध्ये गेले काही वर्ष वाहतूक कोंडी आणि फुटपाथवर अतिक्रमण हा प्रश्न गंभीर बनला होता फुटपाथ वर वाढलेल्या व्यवसायिकांनी पादचारी मार्ग अडवले होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, यांची दखल घेत माणगाव नगरपंचायतच्या अतिक्रम विभागाने मोहीम राबवली. त्यामुळे पाच फेब्रुवारी बुधवारी सकाळी माणगाव नगरपंचायतने हे अतिक्रमण हटवण्याची सुरुवात केली यावेळी काही व्यावसायिकानी देखील या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र अतिक्रम प्रशाशसनने कठोर भूमिका घेतली… प्रश्न असा आहे की ही कारवाई तात्पुरती आहे की काही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत हा प्रश्न उद्भवत आहे, कारण या आधी देखील अशा मोहिमा राबवल्या गेल्या होत्या परंतु काही दिवसांनी परिस्थिती तशीच पूर्ववत झाली अवैध प्रवाशी वाहतुकीच्या समस्येवर प्रशासने ठोस भूमिका घेतली नाही . ही कारवाई दिखाव्या साठी होती की खरंच काही बदल घडणार आहे हे येत्या काही दिवसातच ठरणार आहे.