नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
सिडकोतर्फे गेल्यावर्षी दसऱ्याला २६ हजार ५०२ घरांची सोडत काढण्यात आली होती… या योजने अंतर्गत सिडकोकडे दोन लाखावर अर्ज आले… सिडकोने यासाठी तिन वेळा मुदत वाढ देऊन सुध्दा ३१ जानेवारी २०२५ या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त २२ हजार ग्राहकांकडून अर्जस्वरूप अनामत रक्कम सिडकोकडे जमा झाली आहे…
नवी मुंबईतील खारघर रेल्वेस्थानका लगत घरांची किंमत एक कोटी सात लाख रुपये, तर वाशी येथील घरांची किंमत ८० लाख आहे… तर बामण डोंगरी, खारकोपर (उलवे नोड) घरांची किंमत ४० ते ५० लाख निश्चित करण्यात आली आहे…घराचे मुद्रांक शुल्क, सोसायटी, वाॅटर चार्जेस इतर छुपे कर ग्राहकांकडून वेगळे वसूल करण्यात येणार आहेत…
अर्जदारांची सिडकोतील घरांना नापसंतीची प्रमुख कारणे म्हणजे घरांच्या अफाट किंमती, छुपे कर, बांधकामाचा निकृष्ट दर्जा, तळोजा-नोड येथील मुस्लिम बहुल वस्ती, भरीस पाणीटंचाई आणि खारघर मधील ख्रिश्चन-मुस्लिम धर्मियांसाठी कब्रस्तान वगैरे आहेत, मात्र हिंदू धर्मियांसाठी स्मशानभूमीच नाही… अशी एकना अनेक कारणे आहेत.
सिडकोचे मुख्य अधिकारी, अर्थ, नियोजन व महसूल विभाग यांचा आपापसात ताळमेळ नसल्याने सिडकोतील घरांना नापसंतीची झालर लागून या गृह-योजनेस घर-घर लागल्याचे सिडकोतील निवृत्त कर्मचारी यांचे म्हणणे आहे.