रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कराडे बुद्रुक गावाजवळील अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात प्लॉट नंबर एन.२९ व एन३० या ठिकाणी बी.जी. इंटरप्राईजेस नावाची कंपनी असून याच कंपनीतील सुरक्षारक्षकांनी जवळपास १५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे साहित्य व मशिनरीचे पार्टस चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पनवेल तालुक्यातील कराडे बुद्रुक गावाजवळ असलेल्या अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बी.जी. इंटरप्राईजेस कंपनी आहे… याच कंपनीत सुरक्षितेच्या दृष्टीने एक्सलंट गार्ड फोर्स या सेक्युरिटीची एजन्सी ठेवण्यात आली असून, एक्सलंट गार्ड फोर्सच्या तिघे सुरक्षा रक्षकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तिघांनी संगनमत करून बी.जी. इंटरप्राईजेस कंपनीमध्ये पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे ठेवण्यात आलेले १५ लाख २५ हजार रुपये किमतीचे साहित्य व मशिनरी पार्टस् स्वतःच्या फायद्याकरिता लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेल्याने रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी व आरोपींना जेरबंद करण्यासाठी रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत… या चोरी प्रकरणात सुरक्षारक्षकांसह अन्य साथीदारांचाही समावेश असणार आहे, असा अंदाज व संशय पोलिसांनी वर्तवला असून, पोलीस या चोरीचा छडा लावण्यासाठी कसून शोध घेत आहेत…. या घटनेची माहिती बी.जी. इंटरप्राईजेसचे चीप ऑपरेटिंग जेरोम योहनान जॉन (३९) रा.सीबीडी बेलापूर (नवी मुंबई) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिली असून, चोरट्यांवर काॅ.गुन्हा र.नं.२८/२५ बी.एन.एस.कलम ३०६,३, (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे… याबाबत अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी हे करीत आहेत…