माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ वी जयंती साजरी…

0
118

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

आज गुरूवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ वी जयंती निमित्त पुर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोप-यातून माता रमाईंच्या मुळ गावी वनंद दापोली व महामानव , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळगावी आंबडवे मंडणगड येथे आंबेडकरी अनुयायी मोठ्या संखेने येत आहेत त्यांना दिनांक ६ व ७ फेब्रुवारी दोन दिवस पीण्याचे पाणी, अल्पोपहार, जेवणाची, मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी कव्वाली, आणि मोफत वैद्यकीय सुविधा ई.व्यवस्था रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मंडणगडच्या वतीने दापोली फाटा येथे महाराष्ट्र कमीटी सदस्य आद. दादा साहेब मर्चंडे, रत्नागिरी जिल्हा सचिव आद. आदेश भाऊ मर्चंडे, तालुका आध्यक्ष आद. नागसेन तांबे व मंडणगड गटाचे सर्व सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने पार पाडण्यात आला….