शनिवारपासून खानाव येथे ‘आमदार चषक’प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धा…

0
41

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार) :-

पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार चषक’ प्रकाशझोतातील टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खानाव येथे करण्यात आले आहे… ही स्पर्धा शनिवार दिनांक ०८ ते मंगळवार ११ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे….

स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे तसेच शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत…. स्पर्धेतील विजेत्या संघाला ०१ लाख रुपये व भव्य चषक,उपविजेत्यास ५० हजार रुपये, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी २५ हजार रुपये, मालिकावीरास दुचाकी मोटारसायकल,तसेच उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज व क्षेत्ररक्षकाला आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बक्षिसे असणार आहेत…. या स्पर्धेचा क्रिकेट रसिक प्रेमींनी लाभ घ्यावा,असे आवाहन स्पर्धा आयोजक अ‍ॅड.शशिकांत दिसले यांनी केले आहे…