रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कराडे बुद्रुक गावाजवळील अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात प्लॉट नंबर एन.२९ व एन ३० या ठिकाणी बी.जी. एन्टरप्राईजेस नावाची कंपनी असून, याच कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी जवळपास १५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे साहित्य व मशिनरीचे पार्ट्स चोरून नेल्याचे उघडकीस आल्याने अवघ्या काही तासातच तीन सुरक्षा रक्षकांपैकी दोन जणांना रसायनी पोलिसांनी अटक केली आहे… या चोरी प्रकरणात मोहम्मद शफिक मोहम्मद रफी, मोहम्मद युनिस अब्दुल करीम शेख, रा.गोवंडी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे… याबाबत सविस्तर वृत्त असे की, रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पनवेल तालुक्यातील कराडे बुद्रुक गावाजवळच्या अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात बी.जी. एन्टरप्रायजेस कंपनी आहे…
याच कंपनीत सुरक्षिततेच्या दृष्टीने एक्सलंट गार्ड फोर्स या सेक्युरिटीची एजन्सी ठेवण्यात आली असून, एक्सलंट गार्ड फोर्सच्या तीन सुरक्षा रक्षकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तिघांनी संगनमत करून बी.जी. एन्टरप्रायजेस कंपनीमध्ये पेडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे ठेवण्यात आलेले १५ लाख २५ हजार रुपये किमतीचे साहित्य व मशनरी पार्ट्स स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरी केल्याने रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता… चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी व आरोपींना जेरबंद करण्यासाठी रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या काही तासातच दोन आरोपींना जेरबंद करण्यात रसायनी पोलिसांना यश आले… या चोरी प्रकरणात सुरक्षारक्षकांसह अन्य साथीदारांचाही समावेश असणार आहे, असा अंदाज व संशय पोलिसांनी वर्तवला होता…
सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रसायनी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने काही तासातच दोन आरोपींना गोंवडी मुंबई येथून ताब्यात घेऊन १२ लाख, ४१ हजार रुपये किमतीचे कंपनीचे साहित्य व मशिनरीचे पार्ट्स व चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेला वीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक MH03 DV 0159 असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या चोरीच्या गुन्ह्यातील राजेश कुमार झा व इतर तीन जण फरार असून, त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले…
या घटनेची माहिती बी.जी.एन्टरप्रायजेसचे चीप ऑपरेटिंग जेरोम योहनान जॉन (३९) रा. सीबीडी बेलापूर (नवी मुंबई) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात दिली असून, चोरट्यांवर रॉबरी गुन्हा र.नं.२८/२५ बी.एन.एस.कलम ३०६, ३, (५) अन्वये दाखल करण्यात आला आहे…. या गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवतरे, खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सदर कामाकरिता ३ तपास पथके तयार करण्यात आली… रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार, सहाय्यक फौजदार श्री. कोळेकर, पोलीस हवालदार श्री. चौरे, श्री. बोडके, श्री. पिंगळे, मंगेश लांगी, पोलीस शिपाई राजेश वळवी आदिंनी आरोपींना अटक करून चोरीचा तपास उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे….