उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील) :-
पनवेल महानगर पालिकेतील कामगार प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनाला अनेकवेळा लेखी व प्रत्यक्षात भेटून कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रलंबित प्रश्नांवर रितसर चर्चा करण्याकरीता प्रयत्न करूनही चर्चा होऊ शकलेली नाही…. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे… यामुळे बेमुदत कामबंदची परिस्थिती निर्माण झाली आहे…. आम्ही नागरीकांचा विचार करून नागरिकांना त्रास होऊ नये, या करिता उपोषण करून स्वतःला त्रास करून घेत आहोत… जेणेकरून आपल्या मागण्यांकडे पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे…
यासाठी मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर साहेब, कार्याध्यक्ष-संतोष पवार, सरचिटणीस-अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पनवेल महानगरपालिका कामगार हे पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत, असे म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे विभागियअध्यक्ष श्री. शैलश गायकवाड यानी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे ….