श्रीवर्धन शिवसत्ता टाइम्स (संदेश पेडणेकर):-
श्री सुवर्णं गणेश कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळ दिवेअगर येथे भव्य बैलगाडी शर्यत-२०२५ स्पर्धा दिवेआगर येथे पार पडली… ही स्पर्धा १३ वर्षांनी पुन्हा दिवेआगर येथे पार पडली… एकूण ७० बैलगाड्या आणि १० घोड्यांच्या गाड्यांचा समावेश होता…. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती होती… यावेळी मुरुड येथील उद्योगपती महेश पाटील तसेच जितेंद्र कोतवाल, डी.वाय.एस.पी. सविता गर्जे मॅडम तसेच ए.पी.आय. हनुमंत शिंदे साहेब तसेच दिवेआगरचे सरपंच सिद्धेश कोजबे, गणेश पिलणकर, मंदार तोडणकर, बापट सर, लाला जोशी, मोहम्मद मेमन सर, प्रकाश दादा ठाकूर आणि मोठ्या प्रमाणावर चाहत्यांची समुद्रावर मोठी गर्दी होती…