रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
पुण्यापाठोपाठ आता रायगडमध्ये सुद्धा गाड्या जाळण्याचा हैदोस सुरू झाला आहे.दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री रोह्यातील कुंडलिका नदी लगतच्या रोडवर उभा असलेला धनंजय बाळकृष्ण शिवलकर यांच्या मालकीच्या टेम्पोला जाळण्याचा दुर्दैवी प्रकार एका अज्ञात इसमाकडून करण्यात आला.गाडी जाळण्याचा हा प्रकार रोह्यात पहिल्यांदाच घडला असल्याने स्थानिक पोलीसांसमोर नवीन मोठे आव्हान उभे राहिले आहे. घटनेची खबर मिळताच पोलीसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले आणि अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपींना लवकरात लवकर करण्यासाठी तात्काळ शोधकार्य हाती घेतले आहे.टेम्पो मालक व स्थानिकांचे आरोपींना लवकरात लवकर पकडून अशा प्रकारच्या घटनांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी साकडे घालण्यात आले…