तिहेरी तलाक प्रकरणी पोलिसांकडून मोठी चौकशी… पोलिसांकडून घटनास्थळाचे पंचनामे…आरोपींवर कारवाईची मागणी…

0
31

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):- 

रायगड जिल्ह्यातील महाड-वहूर येथील अब्दुल रहमान नदीम इसाने या व्यक्तीने पत्नी नैना अब्दुल रहमान ईसाने हिच्यासोबत कोणतेही कायदेशीर घटस्फोट,सोडचिट्ठी न घेता जबरदस्तीने तलाक- तलाक- तलाक असे बोलून पहिल्या पत्नीची पूर्व संमती नसताना दुसरे लग्न केले आहे… या प्रकरणी आरोपी पती अब्दुल रहमान नदीम इसाने, आरोपी नदीम इसाने, आरोपी निलोफर नदीम इसाने, आरोपी सलीम इसाने, आरोपी फिरदोस उर्फ गोमा जाकीर इसाने अशा पाच जणांविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे नैनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांकडून मोठी चौकशी हाती घेण्यात आली आहे…

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व अतिरिक्त पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक जगदीश गायकवाड, पोलीस हवालदार प्रवीण राठोड ,महिला पोलीस हवालदार एस.उमरटकर यांच्या संपूर्ण टीमने वहूर येथे जाऊन आरोपीच्या राहत्या घराचे दि.17 फेब्रुवारी रोजी पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे… पोलिसांच्या चौकशीमुळे आरोपींचे धाबे दणाणले असून सदर आरोपी घटनास्थळी मिळून आले नाहीत… तसेच आरोपींनी घराला कुलूप लावून पळ काढल्याचे समजते…पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून संबंधित आरोपींवर कोणती कडक कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे…