टेम्पो-मोटारसायकलचा भीषण अपघात:वीस वर्षीय तरुण ठार… 

0
102

अलिबाग शिवसत्ता टाइम्स धनंजय कवठेकर 

तालुक्यातील नागाव-नाईक आळी येथे टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात वीस वर्षीय मोटारसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.19 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली…. अपघातातील मृत तरुण नागाव-खारगल्ली येथील रहिवासी असून, तो आपल्या भावाला अलिबाग येथे सोडून घरी परतत होता… दरम्यान, अपघातग्रस्त टेम्पो चौल-भाटगल्ली येथील आहे… दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले… परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले…. या अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले… या अपघाताची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत…