माणगाव शिवसत्ता टाइम्स ( वार्ताहर) :-
रायगड, नवीमुंबई तसेच पनवेल येथील मीडिया क्षेत्रात अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या “शिवसत्ता टाईम्सची दक्षिण रायगड बैठक गुरुवार दि. २० फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी माणगाव शासकीय विश्रामगृह येथे पार पडली… यावेळी पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, सुधागड (पाली) येथील प्रतिनिधी उपस्थित होते… सदर बैठकीचे प्रथमच आयोजन करण्यात आले… सदर बैठकीचे कारण हे शिवसत्ता टाइम्स या नामांकित मीडिया सेक्टरमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्य संपादक म्हणून नरेश पाटील यांनी काही दिवसापूर्वी पदभार स्वीकारला…त्यांची ओळख, आढावा बैठक, प्रतिनिधींना आयकार्ड, बुम, लोगो चिन्हाचे वाटप तसेच प्रतिनिधी ओळख, मार्गदर्शन, समस्या अशा अनेक बाबींसाठी एक छोटे खानी बैठक पार पडली…
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व प्रतिनिधींनी आपला परिचय करुन दिली… यानंतर “शिवसत्ता टाईम्स” या सोशल मीडियामधील असलेल्या यूट्यूब, वेब-पोर्टलच्या बातमी, स्क्रिप्ट, अँकरिंग, कॅमेरा हाताळणी कसे करावे…? या बाबतचे अमूल्य मार्गदर्शन ज्येष्ठ संपादक पाटील यांनी केले… तसेच दर दोन ते तीन महिन्यांनी आपण अशीच आढावा बैठक घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले…. त्यानंतर माणगाव शिवसत्ता टाईम्सचे प्रतिनिधी यांच्या वतीने मुख्य संपादक तसेच उपसंपादिका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले…कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणगाव शहरचे प्रतिनिधी दीपक दपके यांनी केले, तर आभार प्रदर्शन “शिवसत्ता टाईम्स ” चे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी असलेले माणगावचे ज्येष्ठ पत्रकार नरेश पाटील सर यांनी केले….