ग्रुप ग्रामपंचायत वरसेमध्ये संत गाडगेबाबा जयंती जल्लोषात साजरी… संत गाडगेबाबा सेवा मंडळाच्या विद्यमाने ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम…

0
18

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):- 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते… लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीचा विस्तार हा शहराहून अधिक आहे… त्यामुळे ही ग्रामपंचायत एक बलाढ्य ग्रामपंचायत आहे… ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच अमित मोहिते यांनी काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीत निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेच्या समस्येमुळे,महिन्याच्या प्रत्येक रविवारी एक दिवस स्वच्छतेसाठी अशी मोहीम आखून दर रविवारी स्वच्छता करण्याची प्रथा सुरू केली आहे…ही मोहीम सातत्यपूर्ण चालू असल्यामुळे परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न हा पूर्णतः संपुष्टात आला आहे…

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत वरसे, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल ,संत गाडगेबाबा सेवा मंडळ निवी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ग्रामपंचायत हद्दीमध्ये  संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान सुरू करून ग्रामपंचायत परिसरातील ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून , कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छ केलेला पाहायला मिळाला. यावेळी सरपंच अमित मोहिते ,माजी सरपंच नरेश पाटील, माजी उपसरपंच शांतीशिल तांबे ,सदस्य तुषार शिंदे ,उद्देश कांबळे ,रोटरी क्लब ऑफ सेंट्रल चे अध्यक्ष रामचंद्र नाकती,सचिव विजय दिवकर रोटरीएन लक्ष्मण मोरे आणि संत गाडगेबाबा सेवा मंडळाच्या पदाधिकारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते….