काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांचा निषेध… अलिबागेत नरेंद्र महाराज संप्रदायाची निदर्शने…

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांचा आज अलिबाग येथे सदगुरू नरेंद्र महाराज सांप्रदायातर्फे निषेध करण्‍यात आला… नरेंद्र महाराज यांच्‍या विषयी एकेरी उल्‍लेख करीत अपमानास्‍पद वक्‍तव्‍य केल्‍याचा दावा करीत त्‍यांच्‍या अनुयायांनी आज अलिबाग येथील जोगळेकर नाक्‍यावर निदर्शने केली… यावेळी वडेट्टीवार यांच्‍या विरोधात घोषणाबाजी करण्‍यात आली. आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेतले होते… नरेंद्र महाराज यांच्‍याविषयी वडेटटीवार यांनी केलेले वक्‍तव्‍य हे हिंदु धर्मातील साधुसंतांचा अपमान असून त्‍यांनी आपले वक्तव्य मागे घ्‍यावे आणि त्‍यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्‍यात आली… नरेंद्र महाराज सांप्रदायातील त्‍यांचे भक्‍तगण मोठया संख्‍येने या आंदोलनात सहभागी झाले होते…