विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप… नरेंद्र महाराजांवर एकेरी भाषेत उल्लेख केल्याने रोह्यात भक्तगण आक्रमक…

0
34

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत… या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रोहा नगरपरिषदेच्या समोरील चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले… जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे अनुयायांमध्ये मोठा संताप पसरला आहे… या वक्तव्याचा निषेध करत संतप्त अनुयायांनी वडेट्टीवार यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली…

रोहा नगरपरिषदेच्या समोरील चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते… परिसरात घोषणा देत फलक दाखवत विजय वडेट्टीवार यांचा वक्तव्याचा निषेध करण्यात आला… आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली… अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला… संतांच्या बाबतीत अशी वक्तव्ये करणे अयोग्य असून, त्यामुळे लाखो भक्तांच्या भावना दुखावल्या जातात, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले… “संत हे समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात… अशा पवित्र व्यक्तीबद्दल अनादराची भाषा वापरणे माफ होणार नाही,” असे एका भक्ताने सांगितले…