क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन… शिरढोण येथे वासुदेव बळवंत फडके यांची 139 पुण्यतिथी…

0
22

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दत्ता मोकल):-   

समाजकार्य, राष्ट्रकार्य,धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते, हे ज्यांनी सिद्ध केले, ते आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १७ फेब्रुवारीला पुण्यतिथी असते… त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनकही म्हटले जाते… त्यांच्या घरात ना क्रांतीचे वारे होते, ना देशभक्तीचे बाळकडू तरीदेखील केवळ आपल्या मातृभूमीची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका व्हावी,म्हणून सर्वसामान्य घरातला एक तरुण सोन्यासारखी नोकरी झुगारून स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांची आहुती देतो, त्या बलिदानाचे मोल राखणे आपले कर्तव्य आहे…

यानिमित्तच आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची 139 पुण्यतिथी शिरढोण येथे पार पडली… यावेळी कॅबिनेट मंत्री गणेश नाईक,आमदार प्रशांत ठाकूर,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राम भोईर ,शिरढोण गावच्या ग्रामपंचायत सरपंच वैशाली भोईर आदी मान्यवर उपस्थित होते… यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले… तसेच यावेळी ही पुण्यतिथी साजरी कशी झाली तसेच कोणी केली याबद्दल मंदार महादेव जोग यांनी सांगितले..