शिवेंद्रराजेंनी केली मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी… येणाऱ्या गणेशोत्सवात रस्ता चाकरमान्यांसाठी सेवेत असल्याचे आश्वासन…

0
25

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

चार दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केली… येणाऱ्या गणेशोत्सवात हा रस्ता चाकरमान्यांसाठी पूर्ण क्षमतेने सेवेत येईल, असे आश्वासन दिले आहे… मात्र महामार्गाची सद्यस्थिती पाहता बायपासची कामे अनेक ठिकाणी झालेली नाहीत…. आणि जी झाली आहेत ती अर्धवट आहेत…. त्यामुळे हेही आश्वासनच ठरेल की काय, अशी शंका उपस्थित होत आहे…. हा महामार्ग कोकणच्या विकासाचा मार्ग समाजाला जातो… हा महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर चाकरमान्यांची वेळेची बचत झाली असती… मात्र महामार्ग पूर्ण करण्यासाठी १५ वर्षांचा कालावधी लोटला तरी कामे अपूर्णच आहेत…

कोकणात राजापूर पासून पुढे गोतापर्यंत महामार्ग सुसाट झाला आहे…. या ठिकाणी सेवा रस्तेही सुस्थितीत बांधण्यात आलेले आहेत…. मात्र रायगड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातच कामे रेंगाळली आहेत…. पेण, वडखळ तसेच इंदापूरपर्यंत बायपास रस्ते बांधण्यात आले आहेत… मात्र ते रस्ते, पेव्हर ब्लॉकने किंवा तात्पुरते बांधण्यात आले आहेत… सध्या हे बायपास खड्डेमय झाले आहेत… त्यामुळे पुन्हा काम करावे लागणार आहे… इंदापूर, माणगाव येथील बायपास रस्ता अजूनही रखडलेला आहे… त्यामुळे ही कामे मे पर्यंत कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे…