रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
पीओपीच्या गणेश मूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदी विरोधात राज्यभरातील गणेश मूर्तीकारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे…आज रायगडमधील गणेश मूर्तींकारांनी अलिबागचे शिंदेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतली…पीओपी बंदीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं अशी मागणी मूर्तिकारांनी यावेळी केली…मूर्तिकार व्यावसायिकांनी पीओपी बंदीचा निर्णय लागण्याआधीच लाखो रुपये कर्ज काढून मूर्ती घडविल्या आहेत… अशा गणेश मूर्तिकारांवर मोठ संकट उभ राहील आहे… हे संकट टळण्यासाठी आमच्यावर सरकारने लक्ष घातलं पाहिजे, असे निवेदन या मूर्तिकारांनी आमदार दळवी यांना दिले…. यानंतर दळवी यांनी येत्या अधिवेशना पूर्वीच गणेश मूर्तिकारांचा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावतील…शिवाय आम्ही रायगड जिल्ह्यातील सातही आमदार याकडे एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि मूर्तिकारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी दिला….