मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू… तरुणाचे मोटर सायकलवरील ताबा सुटल्याने अपघात…  

0
30

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):- 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील केभुर्ली गावाजवळ सोमवारी सायंकाळी मोटर सायकल वरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वराचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे… मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील केभुर्ली गावाजवळ शैलेश कुमार यादव वय वर्षे २४ श्रद्धा राहणार लोणेरे मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी असणारा शैलेश कुमार यादव आपल्या स्वतःच्या मालकीच्या M H.०६ A U१८०५ या दुचाकीने प्रवास करीत असताना केभुर्ली गावाजवळील वळणावर मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात शैलेश कुमार यादव याला गंभीर दुखापत झाली… तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला… याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड कलम १०६, १२५A, १२५B, २५१ सह मोटर वाहन कायदा कलम१८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याबाबत महाड शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत…