पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-
पेण तालुक्यातील दादर गावातील तरुणाला टेम्पोने जोरदार धकड दिल्याने, तर डावरे गावातील तरुण हमरापूर येथे मोटारसायकलवरुन घसरून तसेच कांदळेपाडा येथील तरुण रेल्वेखाली आल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 3 तरुण जागीच ठार झाले…सदर अपघातांमुळे पेण तालुक्यावर सावट पसरले आहे.
सदर अपघातांची सविस्तर माहिती अशी की, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी दादर गावातील हरेश धनाजी पाटील वय-20, रा.दादर, ता.पेण हा तरुण पोलीस भरती परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी गावाबाहेरील स्वामी परमानंद मठाकडे पायी चालत जात असताना MH06BV4092 क्रमांकाच्या थ्रीव्हीलर टेम्पोने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला मागील बाजूस जबर दुखापत होऊन मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 4/2025 भादवी कलम 106 (1), 281, 125 (अ), 125 व मोटार व्हीकल ऍक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुपारी हमरापूर गाव येथील मोरीवर डावरे गावातील विवेक विष्णुदास घरत वय-38 रा.डावरे, ता. पेण हा मोटारसायकल वरून जात असताना गाडी रस्त्याकडेला स्लिप होऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाला… तसेच रामवाडी रेल्वे ट्रॅकवर कांदळेपाडा गावातील निरंजन बाबुराव पाटील वय.23, रा.कांदळेपाडा, ता.पेण हा रेल्वे खाली आल्याने झालेल्या जोरदार अपघातात मृत्युमुखी पडला… सदर घटनेची नोंद 11/2025 BSNS 194 नुसार पेण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे… अधिक तपास पोलीस करत आहेत.