महाशिवरात्री पासून विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवास सुरूवात! श्री जाकमाता देवीच्या पालखीची भव्य मिरवणुक… 

0
40

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे) :-

महाशिवरात्री निमित्त महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांसह, श्री महाकालेश्वर, श्री काशी विश्वेश्वर आणि तालुक्यातील शंकराच्या मंदिरात पहाटे विधीवत पुजा अर्चा अभिषेक करण्यात आला… सकाळपासून सर्वच महादेव मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती….

महाशिवरात्रीपासून विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवास सुरुवात होते… महाडची ग्रामदेवता आई जाकमाता देवी आपला भाऊ श्री विरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवासाठी आज पालखीतून वाजत गाजत येत असते… सकाळी १२ वाजता श्री विरेश्वर देवस्थानचे सरपंच दिपक वारंगे व पंच कमिटी तसेच छबिना उत्सवाचे अध्यक्ष रोहन पवार यांसह महिला वर्गानी मानाची पालखी घेऊन श्री जाकमाता मंदिरात पोचले… या ठिकाणाहून ढोल ताशा, नगारे, बँड पथकाचे गजरात आई जाकमातेची पालखी मिरवणुक काढण्यात आली… या पालखी मिरवणुकीत महाड शहरातील कोटेश्वरी तळे, काजळपुरा, गवळआळी, कुंभारआळी, काकरतळे, तांबटभुवन, नवीपेठ या आळींतील सार्वजनिक आखाडे सहभागी झाले होते… पायघड्यावरून श्री जाकमाता देवीची पालखी मिरवणुक बाजारपेठेतून श्री विरेश्वर मंदीरात नेण्यात आली… यावेळी बाजार पेठेतून सासण काठ्या नाचवण्यात आला… हा पालखी सोहोळा पाहण्यासाठी महाड शहर व परिसरातील लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती… पालखी मार्गावर ठिक ठिकाणी सुहासिनींकडून श्री जाकमाता देवीची ओटी भरण्यात येत होती… सायंकाळी महाड शहरासह तालुक्यातील सर्व शंकर मंदीरात दिपोत्सव करून महाआरती घेण्यात आली… दिवसभर मंदिरांमध्ये भजन, किर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते…